Marathi Kavita lek brings a special bond between father and love, this poem has given a special attentions to readers about the love between father and daughter in the poem लेक मायेच आभाळ
Marathi Kavita lek: लेक मायेच आभाळ
लेक अंगणाची शोभा लेक मायेच आभाळ...
घरा दाराच्या सुखाशी तिची जोडलेली नाळ...
तिच्या घरात येण्यानं किती मुरडती नाक...
तिचचा लवते खरं सा-या जगाच याचाक...
तिला जलामापासून दुःख वाट्यालाच फार...
मोठी झाल्यावर होते माय बापाचा आधार...
तिच्या बोबड्या बोलानं उरी मिळविते जागा ...
दुडूदुडू चालताना घेई अंगणाचा ताबा...
तिच्या कौतुकाच गाणं गाई हिरवं शिवार...
तिचा शाळेत नेहमी येई पहिला नंबर...
माय बापाची लाडकी पोर सानूली ती परी...
तिचं हसणं खेळणं जणू सुखाच्या गं सरी...
पोरं उपवर होता येती पाहुणे दारात...
खणा नारळाची ओटी तिच्या देई पदरात...
तिच लगीन ठरता दारी मांडव थाटतो...
तिला निरोप देताना मनी हुंदहुं का दाटतो...
लेक नांदायला जाता घर खायाला उठते...
नव-याच्या मर्जीने माय बापाला भेटते...
अशा लाडक्या लेकीचा काय सांगावा मी लळा...
दारी अंगणी फुलला ऋतू श्रावण कोवळा...
Also read another marathi poem: Surabhi Mahajan And Her Marathi Poem, काहूर