दोन कुळांचे नाव काढते नात्यांची वेल वाढवते लज्जारक्षणाकारता प्रसंगी जीवही घेते …बाईची जात. नऊ महिने ओझे वाहते आजारपणात रातभर जागते सर्व गुन्हे पोटात घासते बाईची जात. पै-पै करून पैसे जमवते नवऱ्याला उसने देऊन गमावते ढेरी सुटली असंही म्हणते उरलेला भात प्रेमाने वाढते …बाईची जात. पारखून निरखून साड्या घेत्ते घरी आणून कपाटात कोंबते असली दागिने लॉकरला ठेवते नकली घावून अशी मिरवते …बाईची जात. इतरांसाठी प्रेमळ असते किचनमध्ये हैवान असते दळते रगडते, मळते कापत्ते उकळते, तळते आणि भाजते सोलते, कुटते आणि ठेचते कोणते क्रियापद प्रेमळ वाटते तरीही ती सुगरण असते …बाईची जात