Baichi Jaat | मराठी कविता: बाईची जात

Literature/Language

Baichi Jaat | मराठी कविता: बाईची जात

दोन कुळांचे नाव काढते नात्यांची वेल वाढवते लज्जारक्षणाकारता प्रसंगी जीवही घेते …बाईची जात. नऊ महिने ओझे वाहते आजारपणात रातभर जागते सर्व गुन्हे पोटात घासते बाईची जात. पै-पै करून पैसे जमवते नवऱ्याला उसने देऊन गमावते ढेरी…
अशोक सोनवणे
अशोक सोनवणे
October 20, 2022 · 1 Min Read
दोन कुळांचे नाव काढते 
नात्यांची वेल वाढवते
लज्जारक्षणाकारता
प्रसंगी जीवही घेते
…बाईची जात.

नऊ महिने ओझे वाहते
आजारपणात रातभर जागते
सर्व गुन्हे पोटात घासते
बाईची जात.

पै-पै करून पैसे जमवते
नवऱ्याला उसने देऊन गमावते
ढेरी सुटली असंही म्हणते 
उरलेला भात प्रेमाने वाढते
…बाईची जात.

पारखून निरखून साड्या घेत्ते
घरी आणून कपाटात कोंबते
असली दागिने लॉकरला ठेवते
नकली घावून अशी मिरवते
…बाईची जात.

इतरांसाठी प्रेमळ असते
किचनमध्ये हैवान असते
दळते रगडते, मळते कापत्ते
उकळते, तळते आणि भाजते
सोलते, कुटते आणि ठेचते
कोणते क्रियापद प्रेमळ वाटते
तरीही ती सुगरण असते
…बाईची जात
◆ ◆ ◆
Baichi Jaat | मराठी कविता: बाईची जात
1 Min Read
अशोक सोनवणे
Written By

अशोक सोनवणे

Leave a Comment

Recent Poetry Dispatches
s2Member®
Longform Reads
View Submission Guidelines Submit your best longform stories